Beyond Limits with Pournima

Pournima Deshpande

Pournima is here with our intro episode which tells you all about what " Beyond Limits with Pournima" will be. This podcast will help you to understand and get awareness about all the unconventional career options. Exposure to altogether different world of career option is what I will be giving my podcast family... Stay tuned and listen to the podcast. Show your love and drop in your views... Will be back with a new episode of exciting interview soon. Lots of Love and Blessings! Chao..! शीघ्रं मिलाम:

Episodes

  1. 04/04/2021

    Episode-X "ज्योतिषशास्त्र - समज आणि "गैर" समज "

    बऱ्याच गोष्टींवर आपला विश्वास नसतो, आपण जर बघितलं तर एखाद्या गोष्टीवर विश्वास नसण्याचं एक कारण म्हणजे त्यात असलेला ढोंगीपणा, अनेक क्षेत्रां सारखंच ज्योतिष शास्त्रामध्ये पण ढोंगीपणा किंवा पैसे लुबाडण्याची वृत्ती ही आपल्याला सर्रास बघायला मिळते पण त्यातही ज्योतिष शास्त्र एक शास्त्र आहे आणि त्याला शास्त्राप्रमाणे बघितले पाहिजे असे सांगणारे आणि ती गोष्ट पटवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपले पाहुणे  डाॅ. श्री संदिप अवचट.  संदीप दादा एक ख्यातनाम ज्योतिषी तर आहेतच शिवाय ते एक उत्तम कवी देखील आहेत. आपल्या परंपरा, रिती ह्या सगळ्या गोष्टींना सायंटिफिक दृष्टिकोनातून आपल्या समोर मांडून आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास बसेल ह्या करता संदीप दादा कायम प्रयत्न करत असतात. ह्या इंटरव्हिव नंतर माझा  दृष्टिकोन नक्कीच बदललाय, लवकरच गुढी पाडवा येतोय आणि गुढी उभारण्या मागचे सायंटिफिक कारण जाणून घयायचे असेल तर नक्कीच हा एपिसोड ऐका.  हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा   Insta Handle : https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylk https://instagram.com Facebook  Page: https://www.facebook.com/Beyond-Limits-with-Pournima-589590655001535 E -mail : beyondlimitswithpournima@gmail.com   लोभ असावा, पौर्णिमा.

    Episode-X "ज्योतिषशास्त्र - समज आणि "गैर" समज "
  2. 01/03/2021

    "एक निर्णय - A Journey... "

    आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा आपल्याला एक निर्णय स्वतःसाठी घ्यावा लागतो, ह्याच पार्श्वभूमीवर आधारित "एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी.." ह्या मूव्ही चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक आणि यात एक भूमिका करणारे कलाकार असे अष्टपौलू व्यक्तिमत्व असणारे   आणि तीन दशकांहून अधिक काळ या स्वप्नवत चंदेरी दुनियेत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, व्हॉइस आर्टिस्ट आणि एडिटर अश्या सगळ्या भूमिका निभवत स्वबळावर भक्कमपणे उभे राहणारे आज चे आपले पाहुणे श्री. श्रीरंग देशमुख.   त्यांच्याशी आपण आज विविध विषयांवर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत "एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी.." ह्या मूव्हीच्या वेळी त्यांना आलेले विलक्षण अनुभव जे आपल्याला नक्कीच खुप काही शिकवून जातात.  तुमचे प्रतिसाद माझ्या करता मौल्यवान आहेत.  Instagram Handle: https://www.instagram.com/beyondlimitswithpournima/ Facebook Page: https://www.facebook.com/Beyond-Limits-with-Pournima-589590655001535 Gmail: beyonglimitswithpournima@gmail.com  कळावे लोभ असावा...

    "एक निर्णय - A Journey... "
  3. 12/13/2020

    "Success = Satisfaction and not Money...!"

    जेव्हा एक विद्यार्थी ग्रॅज्युएशनला जायला तयार असतो, तेव्हा प्रत्येक आईवडिलांच्या मनात येतो तो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न, हॉस्टेलमध्ये राहायला गेल्यावर त्यांना येणारा स्ट्रेस आणि अडचणी यांच्यावर कशी मात मिळवायची? तर आज आपल्या आठव्या एपिसोड मध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत डॉक्टर राजेश्वरी रपाटा मॅम सोबत, ज्या Dean होत्या आणि त्यांनी अशा भरपूर मुलांना काउन्सिलिंग करून त्यांना ताण-तणाव आणि बाकीच्या अडचणीं मधून बाहेर यायला मदत केली आहे. हा एपीसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका beyondlimitswithpournima@gmail.com  या मेल आयडीवर किंवा Beyond Limits With Pournima ह्या माझ्या इन्स्टा https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylk https://instagram.com आणि फेसबुक पेज वर... तुमच्या प्रतिक्रिया माझ्या करता खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. Link for Dr. Rajeshwari Mam's Podcast on Human Anatomy https://open.spotify.com/episode/36trkNvgxKu1j0JzhvVSb1?si=aAeJ1sSQSSGEsI47Ps7FFg

    "Success = Satisfaction and not Money...!"
  4. 10/10/2020

    "Think Enough"

    बरेचदा आपण स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारतो, मी जे आयुष्य जगते आहे त्यात मी आनंदी आहे का? कारण आपल्या करता आयुष्यात तीनच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे आनंद, समाधान आणि यश आणि या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या आधारावर गुंफल्या गेलेल्या असतात. आज आहे "वर्ल्ड मेंटल हेल्थ डे" आणि आजचा एपिसोड सुद्धा अशा दोन लोकांच्या इन्स्पिरेशनल गोष्टीवर आधारित आहे ज्या लोकांनी स्वतःला जेव्हा प्रश्न विचारला की आपण आनंदी आहोत का? त्यांना त्यांचे उत्तर आनंदाचं शेत ह्या ऍग्रो टुरिझमच्या प्रकल्पात मिळाले , ते आहेत श्री. राहुल कुलकर्णी आणि सौ . संपदा कुलकर्णी. ऐकूयात त्यांना त्यांच्या सुखाचा शोध कसा लावला? आनंद समाधान, आणि यश याची घडी किती सुंदररित्या बसवली त्यांनी बसवली आहे.

    "Think Enough"
  5. 08/15/2020

    गगन भरारी

    प्रिया ज्ञानेश्वर बोडके आणि प्रमोद ज्ञानेश्वर बोडके ह्या दोघांनी त्यांच्या शेती व्यवसायाला एक आधुनिक आणि सुंदर रूप दिलंय. प्रिया हिला  शेतकरी पुरस्कार - महाराष्ट्र सिंचन सहयोग यांचा उत्कृष्ट महिला, आणि २०१६  Krushithon Nashik यांचा प्रयोगशील युवा महिला शेतकरी पुरस्कार मिळाला आहे शिवाय प्रमोद ने मेलानिकेल इंजिनीरिंग करून त्याचा वापर शेती करता केलाय. ५ लाख लोकांचा संच आज हे दोघे त्यांच्या वडिलांसोबत यशस्वी रित्या संभाळताहेत. आज चा एपिसोड मला खूप काही देऊन गेला, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटलं हे मला नक्की कळवा pornima.d@gmail.com . तुम्हाला जर शेती विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रिया बोडके-+91 87965 04477 आणि प्रमोद बोडके -+91 87965 02277 ह्यांना संपर्क करू शकता.

    गगन भरारी

About

Pournima is here with our intro episode which tells you all about what " Beyond Limits with Pournima" will be. This podcast will help you to understand and get awareness about all the unconventional career options. Exposure to altogether different world of career option is what I will be giving my podcast family... Stay tuned and listen to the podcast. Show your love and drop in your views... Will be back with a new episode of exciting interview soon. Lots of Love and Blessings! Chao..! शीघ्रं मिलाम: