AudioWord

Priya Bapat

कथा कविता ललित किस्से

Episodes

  1. 05/04/2021

    संस्कृती म्हणजे -पु.ल.

    संस्कृती म्हणजे – पु.ल. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी … वांग्याचे भरीत …गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…दुस-याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार…दिव्या दिव्या दिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी… दस-याला वाटायची आपट्याची पाने… पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे…सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श… कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा…… – पु.ल.

About

कथा कविता ललित किस्से