ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट

Kishore Kulkarni

आबालवृद्धसाठी #KishorKulkarni चा आवडीचा पॉडकास्ट ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट #DnyanbhartiMarathiPodcast

  1. DnyanBharati Marathi Podcast 51 episode

    05/21/2022

    DnyanBharati Marathi Podcast 51 episode

    ज्ञान भारती मराठी पॉडकास्टचा 51 वा भाग सुप्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांची किशोर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.खास लेख *मुलांसाठी शब्दांची नवलाई लिहिणारे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड...* खानदेशातील जळगाव येथील जैन इरिगेशनच्या कांताई हॉलमध्ये सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे ७ व ८ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात सुप्रसिद्ध बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे 'शब्दांची नवलाई' या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कारही मिळाला; त्या निमित्ताने आव्हाड यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रासाठी ही अत्यंत आनंददायी गोष्ट होय. त्यांच्या लेखन प्रवासाबाबत त्यांच्याशी जळगाव येथील सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी खास गप्पा मारल्या. अत्यंत प्रेरक व बालसाहित्यातून शिशुगट ते कुमारगटातील मुलांवर उत्तम असे वाचन संस्कार या मुलाखतीमुळे होऊ शकतात म्हणून खास वाचकांसाठी... एका चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन भरलेलं असतं. तो चित्रकार चित्रात रंगसंगती अफलातून वापरत असतो. अनेक लोक, रसिक त्या चित्रकाराचं प्रदर्शन बघायला येतात. चित्रांचे प्रदर्शन बघायला एक पत्रकार महिला देखील येते. ती चित्रकाराला विचारते, 'तुमची चित्र आकर्षक सुंदर आहेतच पण त्यातली रंगसंगती अधिक आकर्षित करून घेणारी आहे. फारच वैविध्यपूर्ण रंगसंगती आहे.तुम्ही कोणत्या रंगात कोणता रंग मिसळता की त्यातून एक वेगळाच रंग तयार होतो.जो मनाला आकर्षित करतो. या प्रश्नावर तो चित्रकार पत्रकार महिलेकडे पाहून हसला आणि म्हणाला, 'मुली, मी असं ठरवत नाही की अमुक रंगात तमुक रंग मिसळायचा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो. पण त्या रंगात मी माझं अंतरंग मिसळतोच मिसळतो. कारण कुठलेही चित्र बाह्यरंगामुळे कधीच सुंदर होत नाही. हीच गोष्ट आपल्या आयुष्यालाही लागू पडते.आपण हाती घेतलेल्या कामात जर आपण आपलं अंतरंग मिसळले तर ते काम इंद्रधनुष्यासारखे नक्की फुलून येईल.... पालक आणि विद्यार्थ्यांना असा मोलाचा संदेश देणारे एकनाथ आव्हाड हे बालकविता तर लिहितातच पण कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम देखील त्यांचे यशस्वी झालेले आहेत. ते बालसाहित्याकडे कसे वळले याबाबत खूप छान सांगतात... वयाच्या विसाव्या वर्षी मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. प्रसंग रसाळ पद्धतीने सांगणे हा वारसा आईकडून माझ्याकडे आला.यालाच पुढे कथाकथन म्हणतात असे कळले. आई महानुभाव पंथातली होती. आदरतिथ्य हा तिचा स्वभावगुण होता. घरी कुणी येऊन गेले की तो प्रसंग आई छान रंगवून सांगत असे. खरे तर कथाकथन करण्यासाठी आईचा हा गुण मला खूप कामी आला. मुंबई महानगरपालिकेचा मी एकेकाळचा विद्यार्थी. पुढं शिक्षक झाल्यावर मुंबई महापालिकेच्याच शाळेतच शिक्षक म्हणून रुजू होणे ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट. नवीन उत्साह, नव्या जाणीवा सोबत असल्याने एकनाथ आव्हाड यांनी खूप उपक्रम राबविले. त्यांच्या वर्गात एक विद्यार्थिनी होती. तिच्यावरच त्यांनी पहिली कविता लिहिली....सविता पटेकर सतत गैरहजर...! चिमुकली बालगोपाळ मंडळीआव्हाड यांना भेटली की त्यांना आनंद होतो. त्यांच्या आनंदाची बाग फुलवावी, मुलांना वाचते करण्यासाठी छान छान कविता गोष्टी, लिहाव्यात, ऐकवाव्यात. या करण्यासाठी एकनाथ आव्हाड बालसाहित्य लेखनाकडे वळले. मुलांच्या निकोप वाढीसाठी गोष्टी-कविता-गाणी यातून होणारे हे संस्कार खूप मोलाचे असतात. मुलांना उद्देश नकोच असतो. परंतु एखाद्या गोष्टीतील चरित्राने जर मुलांमध्ये चांगली वागणूक निर्माण व्हायला मदत झाली किंवा जी व्यक्तिरेखा त्या कथेत चितारली आहे; आपणही त्यासारखं वागू या असा विचार मूल करू शकतं. लहानपणापासून चांगले वागण्याचा प्रयत्न तो करत राहतो असे आव्हाड आत्मविश्वासाने म्हणतात. पुस्तकावर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे. आव्हाड लहान असताना आपल्या खाऊचे मिळालेले पैसे साठवून त्या पैशातून गोष्टींचे पुस्तक ते विकत घेत असत. लहानपणी वाचनाची गोडी लागल्यामुळे आपण लेखन करू लागलो हा स्वानुभव ते आवर्जून सांगत असतात. खरे तर जसे आपण महिन्याचे किराणा आणतो, त्याची यादी बनवतो. त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली असते. त्याप्रमाणेच दर महिन्याला पुस्तक खरेदीची तरतूद करण्यात यावी. पुस्तक खरेदी करून कपाटाची फक्त शोभा करायची का? तर मुळीच नाही, घरात वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. पालकांच्या हातात मोबाईल आहे व ते पालक मुलांच्या हाती बळजबरी पुस्तक

    21 min
  2. 04/30/2022

    DnyanBharati Marathi Podcast 50 episode

    श्रोते हो, आपल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नाने आयुर्वेद सिगारेटचे पेटंट मिळवणारे डॉक्टर राजस नित्सुरे यांची आरती आपटे यांनी घेतलेली मुलाखत. ज्ञानभारती मराठी पॉडकास्टचा हा 50 वा म्हणजेच सुवर्णमहोत्सवी भाग! आपण सर्व श्रोत्यांनी या पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपलं ऋणी व्यक्त करतो. येणाऱ्या कोणत्या तरी एखाद्या शनिवारच्या भागात झालेल्या या 50 एपिसोडस् चा एक छोटासा आढावा आम्ही घेणार आहोत. येणाऱ्या या भागाकडे आपण नक्की लक्ष द्या...आढावा घेतलेला एपिसोड अपलोड झाल्यावर आपल्याला ते कळेलच परंतु; या सुवर्णमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या एपिसोडमध्ये आम्ही काही प्रमाणावर ती बदल करणार आहोत... उदाहरणार्थ आम्ही 'ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट'चा युट्युब एपिसोड याकडे देखील आता लक्ष देणार आहोत. युट्युब चॅनेल आणि हे ऑडिओ चॅनल या दोन्ही माध्यमातून आपल्या पर्यंत आम्ही पोहोचणार आहोतच, असेच प्रेम कायम असू द्या. काही सूचना काही एपिसोडच्या बाबतीमध्ये आपलं मत प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद! किशोर कुळकर्णी, ज्ञानभारती पॉडकास्टर 9422776759

    34 min
  3. 04/16/2022

    DnyanBharati Podsact 48 episode Vyankateshji interview

    भारतात गोली वडा पाव च्या 350 हून अधिक औटलेट्स दर महिन्याला 200 कोटी रुपयांचा पगार आणि चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते असं सगळं या गोली वडापाव च्या माध्यमातून होत आहे विशेष महत्त्वाचे म्हणजे या गोली वडापाव च्या त्यांचे जी संपूर्ण भारत भर दिले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून गोरगरिबांना वडापाव मिळतो स्वस्तामध्ये मिळतो आणि लोकांना रोजगार देखील मिळते या गोली वडा पाव चे संस्थापक उद्योजक व्यंकटेश अय्यर यांनी गोली वडा पाव ची यशोगाथा सांगितले जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात जितो जळगाव चॅप्टर तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमास व्यंकटेश अय्यर यांची भेट झाली आणि त्यांना परकास विषयी विचारणा केली असता सार्वजनिक हा जो कार्यक्रम होतं तोच तुम्ही तरी कॉल करा आणि तो प्रसारित करा हे त्यांनी मला सांगितलं आणि खूप छान गोलीचा हा प्रवास आपल्याला ही रंजक वाटेल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा....

    33 min

About

आबालवृद्धसाठी #KishorKulkarni चा आवडीचा पॉडकास्ट ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट #DnyanbhartiMarathiPodcast