प्रकृती : आरोग्याचा पॉडकास्ट | Prakruti : Health Podcast

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more. 

  1. स्नान उपचार Naruropathy baths,

    02/16/2024

    स्नान उपचार Naruropathy baths,

    आपण रोजच पाण्याने स्नान करतो, मग त्यात विशेष काय? कोणकोणती स्नानं असतात ते तर आज मी सांगणारच आहे. पण त्याबरोबर आणखी काही तरी सांगणार आहे. काय होतं, की हे स्नानोपचार घेण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी निसर्गोपचार केंद्रात जावं लागतं. तिथे सगळी साधनसामग्री असते, भरपूर आणि योग्य तपमानाचं पाणी असतं, हे उपचार शिकलेले उपचारक असतात. पण सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेलच असं नाही.  त्यामुळे आपल्याला घरी, उपलब्ध साधनांमध्ये, त्याच्या खालोखाल काही करता येईल का तेही आपण पाहाणार आहोत. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

    13 min
  2. जादूची लपेट The Magic Band

    01/30/2024

    जादूची लपेट The Magic Band

    पाणी अनेक प्रकारांनी उपचारासाठी वापरलं जातं. आज आपण पाहाणार आहोत ती जादूची पट्टी अर्थात लपेट पट्टी हा त्यातलाच एक भाग. वापरण्यास अतिशय सोपा, सुटसुटीत, सहज आणि अतिशय परिणामकारी. या  जादूच्या पट्टीचं नाव आहे, लपेट पट्टी किंवा वेट पॅक. डोकं दुखत असेल तर डोक्याला. हात पाय कंबर दुखत असेल तर त्या त्या ठिकाणी,  पोट साफ होत नसेल, घशाशी येत असेल, मूत्रविकार असतील तर पोटाला लपेटून ठेवायची. दारात बोट चेमटलं, मान लचकली, कंबर धरली, अति व्यायामाने स्नायू दुखावले, जास्त वजन उचलल, प्रवासात मान अवघडली, खरचटलं, कापलं – लपेट पट्टी. जखम झाली, लपेट पट्टी. भाजलं, लपेट पट्टी. मुका मार – लपेट पट्टी. थायरॉइड, बीपी, लठ्ठपणा -– लपेट पट्टी. कीटकदंश, मुंगी चावणे इत्यादी - लपेट पट्टी  अगदी मूळव्याधीवरसुद्धा पूरक उपचार म्हणून लपेट पट्टी.  सगळयाला ही लपेट पट्टी लपेटणे. एवढं कसं काय जमतं बुवा या लपेट पट्टीला? शास्त्र सोपं आहे त्याच्यामागचं. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

    17 min
  3. नैसर्गिक प्रथमोपचार First Aid

    01/18/2024

    नैसर्गिक प्रथमोपचार First Aid

    नेहमीच्या तक्रारी, तसं म्हटलं तर किरकोळ, पण त्रासदायक. त्यावर काहीतरी झटपट उपाय करून कामाला लागावं ही इच्छा.  पण तुमच्या निसर्गोपचारात तर परिणाम व्हायला वेळ लागतो म्हणे, मग काय, गोळीच घ्यावी लागणार ना! नाही नाही नाही... शुद्ध गैरसमज.  निसर्गोपचारात तर सगळ्यात झटपट परिणाम दिसतात. तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा आणि निसर्गापेक्षा शक्तिमान काय आहे?  गोळी घेऊन १५ मिनिटांत तात्पुरतं डोकं दुखायचं थांबत असेल, तर नैसर्गिक प्रथमोपचारांनी ते दहाच मिनिटांत थांबणार आहे. बघा प्रयोग करून.  काय करायचं? तेच तर सांगणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

    16 min
  4. पर्व दुसरे - अध्याय दुसरा

    SEASON 2, EPISODE 1 TRAILER

    पर्व दुसरे - अध्याय दुसरा

    प्रकृती पॉडकास्टचे ४१ भाग ऐकल्यानंतर आता नवं काय? दुसऱ्या पर्वात काय आहे? नॅचरोपॅथीमध्ये औषधं गोळ्या इंजेक्शन असं काही नसतं. मग नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टर करतात तरी काय? दुसऱ्या पर्वात आपण त्याचीच ओळख करून घेणार आहोत. शिवाय नव्या भन्नाट उपक्रमाची सुरुवात - ऐकताय काय, सामील व्हा! उपक्रमात सामील होण्यासाठी मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti       किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज  किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  नक्की सामील व्हा. आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

    6 min
  5. 60@60

    09/13/2023

    60@60

    माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी १२ तासांत ६० किमी अंतर चालले त्याची ही गोष्ट. आणि त्यानंतर लगेच नेहमीसारखी कामाला लागले, एकही दिवस शिणवटा आला नाही, हा गोष्टीचा उत्तरार्ध. का, कसं, कशासाठी, कुठे, केव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आहेत. ६० किमी हा काही विशेष पराक्रम नाही, तुम्ही खरोखरचे मोठे पराक्रम केले असतील तर मला कळवा, आपण ते सर्वांपर्यंत पोचवू. किंवा असं काहीतरी तुम्हाला करावंसं वाटत असेल, तरी मला सांगा, तुम्हाला मदत करायला मला नक्कीच आवडेल.  तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

    33 min
  6. थकवा Fatigue

    09/06/2023

    थकवा Fatigue

    भयंकर थकवा ही भयंकर समस्या असू शकते. खूप शारीरिक कष्ट, श्रम, हालचाल यांनी थकवा येणं हे स्वाभाविक आहे, आणि तो भरून निघणं आणि पुन्हा उत्साह येणं हेही स्वाभाविक आहे.  सतत असणारा थकवा नुसत्या गोळ्या इंजेक्शनांनी बरा होत नाही. त्याची कारणं शोधून ती दूर करणं आणि शरीराला मदत करणं याने थकणं-भरून निघणं हे चक्र सुरळीत चालू रहातं. कोणत्याही वयाच्या, कोणत्याही व्यवसायातील व्यक्तीला शारीरिक कष्टांनी, मानसिक ताणांनी येणारा भयंकर थकवा दूर झालाच पाहिजे. उत्साह, चापल्य ही नैसर्गिक अवस्था आहे. ती नेहमीसाठी कशी प्राप्त करून घ्यायची हे ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात.  तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर  किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==  आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

    15 min

Trailers

Shows with Subscription Benefits

AD-FREE FULL ACCESS

Bonus episodes, specials and early access.

$3.99/mo or $14.99/yr after trial

About

Health is natural. Health is not dependency on medicines. Health is balance, equilibrium of the five elements within. Prakruti brings you learning and unlearning of our habits, food, exercise, rest and general daily routine. Small changes big difference. Prakruti brings you good recipes, exercises, fun and simple tricks and treatments, wonderful case studies and a lot more. 

More From Bingepods