"राज"कारण " Rajkaran

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

  1. 5d ago

    RAJ'KARAN PODCAST : ज्या बंगल्यात जन्म झाला... त्याच बंगल्यात तब्बल ५५ वर्षांनी मंत्री म्हणून गृहप्रवेश!

    लोकनेते बाळासाहेब देसाईंपासून ते आजचे मंत्री शंभूराज देसाई आणि चौथ्या पिढीतील यशराज देसाई यांच्यापर्यंतच्या प्रेरणादायी राजकीय प्रवासाची ही गोष्ट. शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेतील भूमिका, कोयना भूकंपातील मदतकार्य, मुख्यमंत्रीपद हुकल्याची चर्चा, शिवसेनेतील प्रवेश, संघर्षातून मिळवलेले यश आणि तब्बल ५५ वर्षांनंतर ज्या 'मेघदूत' बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात मंत्री म्हणून झालेला गृहप्रवेश—या सर्व घटनांचा मागोवा घेणारा हा विशेष पॉडकास्ट. महाराष्ट्राच्या राजकारणातील चार पिढ्यांचा इतिहास, संघर्ष, तत्त्वनिष्ठा आणि लोकसेवेचा वारश्याची कथा KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shambhuraj Desai, Balasaheb Desai, Desai Family, Maharashtra Politics, Patan Constituency, Shivaji University, EBC Scheme, Maharashtra Cabinet, Political Legacy, Marathi Podcast

  2. Jul 10

    RAJ'KARAN PODCAST : सोनिया गांधी नऊवारी नेसून उतरल्या होत्या शरद पवारांच्याविरोधात मैदानात; अनंतराव थोपटे

    १९९९ मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमधून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. या बंडानंतर सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात थेट शरद पवारांच्या राजकीय बालेकिल्ल्यात उतरून काँग्रेसची ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी त्यांनी नऊवारी साडी नेसून सभा घेतली. या सभेमागील राजकीय रणनीती, शरद पवार विरुद्ध सोनिया गांधी यांच्यातील संघर्ष, अनंतराव थोपटे यांची भूमिका आणि त्यानंतर महाराष्ट्रातील बदललेली सत्तासमीकरणे सविस्तर जाणून घ्या. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Sonia Gandhi, Sharad Pawar, Anantrao Thopte, Bhor Rally 1999, Congress vs NCP, NCP Formation, P A Sangma, Tariq Anwar, Maharashtra Politics, Congress History, Sonia Gandhi Speech, Nauvari Saree, Bhor Assembly Constituency, Ram Pradhan, Vilasrao Deshmukh, Baramati Politics, 1999 Maharashtra Election, Political Strategy, Congress High Command

  3. Jul 3

    RAJ'KARAN PODCAST : शिवसेनेतील दोन मोठ्या भूकंपांमागे एकच छुपी गोम; 'मुंबई विरुद्ध घाटी' संघर्षाचा संपूर्ण

    छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे फक्त सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. तर त्यामागे शिवसेनेतील अनेक वर्षांचा 'कोकण विरुद्ध घाट' हा अंतर्गत संघर्हीष दडला होता. १९९१, २०२२ आणि २०२६ या ३ ऐतिहासिक बंडांची तुलना करत हा पॉडकास्ट शिवसेनेतील प्रादेशिक सत्तासंघर्ष, मातोश्रीभोवतीचं नेतृत्व, घाटावरील नेत्यांची नाराजी आणि त्यातून घडलेले राजकीय भूकंप उलगडतो. भुजबळांच्या बंडातील १७ आमदारांपासून ते शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपर्यंतचा प्रवास, त्यामागील राजकीय गणित आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित प्रादेशिक वादाचा सखोल वेध या भागात घेतला आहे. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shiv Sena, Chhagan Bhujbal, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Konkan vs Ghat, Shiv Sena Rebellion, Maharashtra Politics, Matoshree, Political Podcast, Sarkarnama

  4. Jun 26

    RAJ'KARAN PODCAST : भास्कर जाधवांनी पहिल्यांदा शिवसेना मिलिंद नार्वेकरांना नडूनच सोडली होती... 22 वर्षांच्य

    भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "नार्वेकर कोण लागून गेला?" या वक्तव्यामुळे २२ वर्षांपूर्वीचा संघर्ष पुन्हा समोर आला. २००४ मध्ये तिकीट कापल्याचा आरोप करत भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते. मात्र २०१९ मध्ये याच नार्वेकरांनी जाधवांची शिवसेनेत घरवापसी घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मग नेमकं काय घडलं होतं? काय आहे जाधव-नार्वेकर संघर्षाची संपूर्ण कहाणी, जाणून घ्या पडद्यामागचे किस्से KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Bhaskar Jadhav, Milind Narvekar, Uddhav Thackeray, Shiv Sena UBT, Bhaskar Jadhav vs Milind Narvekar, Maharashtra Politics, Shiv Sena Politics, Ratnagiri Politics, Sharad Pawar

  5. Jun 19

    RAJ'KARAN PODCAST : भुजबळांचा 'गेम ओव्हर' झाला होता... पण विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने महाराष्ट्राच

    1991 मध्ये शिवसेनेचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं आमदारपद जाणं निश्चित मानलं जात असतानाच विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाने संपूर्ण खेळच बदलून गेला. 16 आमदार परत फिरल्यानंतरही भुजबळ कसे वाचले? काय होती कायद्यातील ती पळवाट? आणि या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी बदलली? जाणून घ्या या सरकारनामा राजकारण पॉडकास्टमध्ये, एका ऐतिहासिक बंडाची आणि राजकीय चातुर्याची थरारक कहाणी. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, chhgana Bhujbal, Balasaheb Thackeray, Shiv Sena Split 1991, Madhukarrao Chaudhari, Anti Defection Law, Maharashtra Politics, Sharad Pawar, Manohar Joshi, Political Rebellion, Sarkarnama Podcast

  6. Jun 12

    RAJ'KARAN PODCAST : 50 मृत्यू, 2000 जणांना अटक अन् डॉक्टरकीचा काळाबाजार : इतिहासातील थरकाप उडवणारा रक्तरंजित घो

    नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप उसळला असतानाच पुन्हा चर्चेत आलाय मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध ‘व्यापम’ घोटाळा. हजारो कोटींच्या या रॅकेटमध्ये मेडिकल प्रवेश, सरकारी नोकऱ्या, दलाल, अधिकारी, राजकारणी आणि संशयास्पद मृत्यूंची मालिका समोर आली होती. तब्बल ५० मृत्यू, २००० पेक्षा अधिक अटक आणि सीबीआय चौकशीमुळे हादरलेलं शिवराज सिंह चौहान सरकार… नेमकं काय होतं व्यापम प्रकरण? कसा चालत होता हा काळाबाजार? आणि आजच्या नीट पेपरफुटीशी त्याचं साम्य काय? पाहा सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये या देश हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याचा संपूर्ण प्रवास. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, व्यापम घोटाळा, NEET Paper Leak, Vyapam Scam, Shivraj Singh Chouhan, Medical Admission Scam, Education Corruption, CBI Investigation, NEET Scam Marathi, Sarkarnama Podcast, Madhya Pradesh Scam

  7. Jun 5

    RAJ'KARAN PODCAST : वानखेडेनंतर शिवसैनिकांनी दिल्लीचं 'कोटला' स्टेडियम गाजवलं; ठाकरेंच्या एका विरोधानं वा

    १९९९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध करत शिवसैनिकांनी थेट दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर घडलेल्या या धक्कादायक आंदोलनामुळे संपूर्ण देश हादरला होता. केंद्र सरकार, BCCI आणि सुरक्षा यंत्रणा अडचणीत आल्या होत्या. सामना दिल्लीहून चेन्नईला हलवावा लागला आणि अखेर लालकृष्ण अडवाणींना स्वतः मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यावी लागली. नेमकं काय घडलं होतं? कोण होते ते शिवसैनिक? आणि या आंदोलनामागचं राजकीय गणित काय होतं? पाहा सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Feroz Shah Kotla Pitch, India Pakistan Cricket, Wankhede Stadium Protest, Pakistan Tour India 1999, Shiv Sainik Protest, Lal Krishna Advani, Atal Bihari Vajpayee, Sarkarnama Podcast

  8. May 29

    RAJ'KARAN PODCAST : बाळासाहेबांच्या एका निर्णयाने बदलला सत्तेचा खेळ : गोष्ट शिवसेनेतील सर्वात मोठ्या संघर

    शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सत्तासंघर्षाची ही Inside Story! बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पक्षाचा वारसदार कोण होणार? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? 1990 च्या दशकातील शिवसेनेतील वाढत गेलेले मतभेद, रमेश किणी प्रकरणानंतर बदललेलं राजकीय समीकरण, 1997 आणि 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुका, आणि अखेर उद्धव ठाकरेंसाठी तयार करण्यात आलेलं ‘कार्याध्यक्ष’ पद… या सर्व घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदललं. राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव का मांडला? आणि त्यानंतर मनसेचा जन्म कसा झाला? पाहा सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Raj Thackeray, Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Maharashtra Politics, Raj vs Uddhav, Shiv Sena Succession, MNS, Matoshree Politics, Sarkarnama Podcast

About

सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple

More From Bingepods