ग्रंथप्रेमी - Granthpremi

Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

  1. 1d ago

    प्रभावी भाषणकला - पुस्तकातून अभिवाचन भाग - 2

    भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇 भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात आपण लेखक रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या लोकप्रिय पुस्तकातील एका महत्त्वपूर्ण प्रकरणाचा वेध घेत आहोत. भाषण करायला जाताना सोबत नक्की कोणाला न्यावे? हा वरवर सोपा वाटणारा प्रश्न किती गहन आहे, हे लेखकाने यात सुंदररीत्या स्पष्ट केले आहे. वक्तृत्व स्पर्धेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे पालक यांच्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. भाषण कलेतील हे गुपित जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

    8 min
  2. Jun 5

    राजा दाहिर - भाग 2 काका विधाते सर यांची मुलाखत

    आपल्या मातीसाठी प्राणांचे बलिदान देणारे सिंधचे राजा दाहिर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा या दुसर्‍या भागात आपण समजून घेणार आहोत ज्येष्ठ कादंबरीकार आणि इतिहास तज्ञ श्री काका विधाते यांच्याकडून! Unearth the dramatic history of the Battle of Sindh and the legendary resistance of its last Hindu ruler, King Dahir. King Dahir & his entire family sacrificed their lives for Sindh! The story of his wife queen Laadi & his 2 daughters is a must watch. Join us as we review the powerful insights from the acclaimed historical book 'Dastan-e-Dahir.' काका विधाते यांनी लिहीलेली "दास्ता ए दाहिर" ही कादंबरी ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/dasta-e-dahir अथवा खालील नंबर वर संपर्क करा - WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 10.30 ते स. 6)

    49 min
  3. May 29

    नामस्मरण कसे करावे ?

    "आम्हाला देवाचं नाव घ्यायला आवडतं, पण नामस्मरण करताना मनात हजारो विचार येतात, एकाग्रता होत नाही!" ही तुमचीही समस्या आहे का...? काळजी करू नका. 'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या विशेष भागात आपण पाहणार आहोत की, कोणत्याही सद्गुरूंचा अनुग्रह मिळालेला नसला, तरीही सामान्य प्रापंचिक माणूस दैनंदिन कामे करताना देखील (जसे की स्वयंपाक करणे, फिरणे, ऑफिसचे काम) देवाचे नाव कसे घेऊ शकतो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तत्त्वज्ञानावर आधारित, मनाची एकाग्रता वाढवणाऱ्या ४ प्रॅक्टिकल पद्धती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. काय पहाल या भागात ? • नीजवृत्ती काढी - या अभंगाचा अर्थ • नामस्मरण कसे करावे ? त्याच्या 4 पद्धती • ज्ञानेश्वरीतील 'सुवर्ण आणि कंकण' यांच्या उदाहरणातून भक्ती योगाचा खरा अर्थ. • संत गोरोबा काकांचा उपदेश: "देह प्रपंचाचा दास सुखे करो काम". • भीष्म पितामहांनी सांगितलेली 'मानस तीर्थे' कोणती? अनिल फडणवीस यांनी लिहिलेले गोष्टीरूप हरिपाठ पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/collections/best-sellers/products/goshtirup-haripath अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 11 ते स. 6) हे पुस्तक Flipkart आणि Amazon वर देखील उपलब्ध आहे

    19 min
  4. May 22

    Last Hindu King of Sindh Raja Dahir - History with Author Kaka Vidhate

    तब्बल ७० वर्षे, अरबांची १४ आक्रमणे, या हिंदुशाही राजवटीने - सिंधने परतवून लावली. अवघ्या १७ वर्षांचा मोहम्मद बिन कासिम, ज्याने भारतावर १५ वे यशस्वी आक्रमण घडवून आणले, तेंव्हा हिंदू राजा दाहिर तिथे राज्य करत होता. असे काय घडले की ७११ मधील १५ व्या आक्रमणात भारताचे सिंध हे अभेद्य प्रवेशद्वार कोलमडले? या संपूर्ण युद्धाचा टर्निंग पॉईंट काय होता? जिंकत आलेली लढाई एका क्षणात पराभवात कशी बदलली? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या विशेष भागात, ज्येष्ठ कादंबरीकार श्री. काका विधाते यांच्या 'दास्तां-ए-दाहीर' या ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सिंधचे अंतिम हिंदू राजे —राजा दाहीर यांचा दैदिप्यमान इतिहास! काय पहाल या भागात.. ? • सिंधची एकाकी झुंज: मध्यवर्ती सत्ता बळकट नसल्यामुळे भारताचे प्रवेशद्वार असणारा सिंध प्रांत परकीय आक्रमणा वेळी कसा एकाकी पडला? • अरबांनी लिहून ठेवलेल्या 'चाचनामा' ग्रंथाच्या आधारे उघड होणारा सिंध राज्याचा इतिहास. • अरबांचा तत्कालीन इतिहास, मुस्लिम धर्म आणि त्यांची तलवार याचा संबंध काय ? • अंतर्गत कलहाचा शाप: सिंध प्रांतात बौद्ध धर्मीय प्रजा आणि ब्राह्मण राजे यांच्यातील अंतर्गत दुराव्याचा फायदा परकीय आक्रमकांनी कसा घेतला? * राजा दाहिर याला हिंदुस्तान आणि आपण का विसरलो ? हा अस्सल, रक्तरंजित इतिहास ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मातीसाठी बलिदान देणाऱ्या या 'अनसंग हिरो' आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा प्रेरणादायी आहे.

    54 min
  5. May 15

    प्रभावी भाषणकला या रविंद्र देसाई लिखित पुस्तकातून अभिवाचन

    तुमचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये का? मग पहा संवादाचं मानसशास्त्र! आपल्याला अनेकदा वाटतं की 'भाषण' म्हणजे फक्त स्टेजवर उभं राहून ओरडणं. पण तुम्हाला माहितीये का? प्रभावी भाषण ही खरं तर संवादाची कला आहे जी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांशी किंवा ऑफिसमध्ये बोलतानाही वापरू शकता. या व्हिडिओमध्ये आम्ही रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या पुस्तकातील अशा काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. लोक तुमचं का ऐकतात? एकतर प्रेमापोटी किंवा आदरापोटी. पण आदर मिळवण्यासाठी मेहनत लागते, तर मैत्री मिळवण्यासाठी फक्त काही बेसिक गोष्टींची गरज असते. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल: • लोक तुमचं म्हणणं मन लावून कधी ऐकतात? • पहिल्या वाक्यापासून श्रोत्यांशी मैत्री कशी करावी? • रटाळ भाषण टाळून 'चटपटीत' संवाद कसा साधावा? जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मुलं, जोडीदार किंवा तुमचे सहकारी तुमचं ऐकत नाहीत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. शेवटपर्यंत नक्की पहा!

    8 min
  6. May 8

    Secrets of Ayurveda Cooking with Dr Rupali Panse

    तुमचा रोजचा स्वयंपाक एक 'कला' आहे? डॉक्टर रूपाली पानसे यांच्या मते, ते त्याही पलीकडे जाऊन एक प्रगत 'सायन्स' आहे! या खास भागात, आम्ही केवळ कॅलरीज मोजण्यापेक्षा आपल्या शरीराचा 'अग्नी' आणि 'प्रकृती' समजून घेण्यावर भर दिला आहे. 'फूड पिरॅमिड' ही संकल्पना आता जुनी झाली असून, आपण आपल्या ताटातील अन्न (My Plate) आयुर्वेदाच्या नजरेतून कसे पाहावे, हे या पॉडकास्टमध्ये उलगडले आहे. आपल्याला पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील: पाण्याने खरोखर डिटॉक्स होतं का? दूध पचत नसेल तर तूप खाणे योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, सहा रसांचे (Six Tastes) आपल्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) देखील आता या प्राचीन विज्ञानाकडे का वळते आहे, हे जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की पहा. आरोग्याकडे आणि अन्नाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलेल!

    1 hr
  7. May 1

    आनंद योग पुस्तकातून एका कथेचे अभिवाचन

    कृष्णलीलांमध्ये काय योग रहस्य दडले आहे हे समजण्यासाठी ही कथा नक्की ऐका! आपण अनेकदा म्हणतो की "संसार आहे तर दुःख असणारच." पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पौराणिक कथांमध्ये, अध्यात्म आणि योगमार्गात आहे का? या भागात आपण अनिल फडणवीस यांच्या 'आनंद योग - ध्यानासहित' या पुस्तकातील एक अतिशय सुंदर अशी "बाळकृष्ण आणि महादेव यांची भेट" ही कथा ऐकणार आहोत. या भागात आपण पाहणार आहोत: • गोकुळ आणि मानवी देह यांचा नेमका संबंध काय? • संसारग्रस्त जीवन शांत होण्यासाठी महादेवांसारख्या वैराग्याची गरज का असते? • अध्यात्मिक दृष्टीने 'रडणे' थांबवून आयुष्यात 'हास्य' कसे आणावे? तुमचा आध्यात्मिक आणि योगमार्गावरील प्रवास सुरू करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! अनिल फडणवीस यांनी लिहिलेला आनंद योग - ध्यानासहित पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/products/anand-yog अथवा खालील नंबर वर संपर्क करा WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 11 ते स. 6) हे पुस्तक Flipkart आणि Amazon वर देखील उपलब्ध आहे

    9 min
  8. Apr 24

    What is Cyber Parenting ? Mukta Chaitanya interview on Granthpremi podcast

    तुमचं मूल रात्री २ वाजेपर्यंत मोबाईलवर काय करतंय? आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ही दुधारी तलवार झाली आहे. १० वर्षांखालील मुलं देखील रात्री जागी राहून गेमिंग आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहेत, हे जितकं धक्कादायक आहे तितकंच भयानकही! "सायबर पालकत्व" या पुस्तकाच्या लेखिका मुक्ता चैतन्य यांच्याबरोबर आपण या पॉडकास्ट मध्ये खालील विषयांवर चर्चा केली आहे: • मुलांच्या झोपेच्या समस्या आणि त्यामागील 'डिजिटल फटीग'. • सोशल मीडियापेक्षाही घातक असलेले 'हायपर-रियलिस्टिक' गेम्स आणि त्यांचे मेंदूवर होणारे परिणाम. • 'शेअरेंटिंग' (Sharenting) म्हणजे काय? • पिडोफिलिया आणि डार्क वेबचे धोके • 'न्यूरोप्लास्टिसिटी' म्हणजे काय आणि मुलांच्या सवयी कशा बदलता येतात? • 'एज्युकेशनल गेम्स' खरोखर फायदेशीर आहेत का? • मोबाईलमुळे मुलांच्या रिफ्लेक्सेसवर आणि क्रिटिकल थिंकिंगवर होणारा परिणाम. • घरात 'डिजिटल शिस्त' कशी लावावी? तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे 'सायबर पालकत्व' समजून घेणं काळाची गरज आहे, म्हणूनच हा पॉडकास्ट महत्वाचा आहे!

    50 min

About

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi