Dehbhan

Niranjan Medhekar

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality! Contact For feedback, suggestions and collabs you can reach us at niranjan@soundsgreat.in Instagram : https://www.instagram.com/dehbhan_podcast Facebook : https://www.facebook.com/

Episodes

  1. 13h ago

    Intercourse During Pregnancy is Good Or Bad | Dr Manasi Naralkar

    लग्नानंतर कितीही प्लॅनिंग करून बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला तरी बाळ झाल्यावर आपलं सेक्स लाईफ संपणार तर नाही ना ही भीती अनेक जोडप्यांना सतावत असते. दुसरीकडे बाळ कन्सिव्ह झाल्यावर नऊ महिने एकमेकांच्या अजिबात जवळ यायचं नाही हा पण अलिखित असा नियमच आहे आपल्याकडे. त्यामुळेच प्रेगनन्सीमधलं आणि मूल किंवा मुलं झाल्यानंतरचं कामजीवन कसं असतं, मुळात ते काही शिल्लक राहतं का (!) या महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. No matter how much couples plan for parenthood, one common fear remains: Will our sex life disappear after having a baby? On the other hand, many people still believe that once pregnancy begins, couples should completely avoid physical intimacy for all nine months. But how true are these beliefs? In this episode, we're exploring the often-ignored yet incredibly important topic of intimacy during pregnancy and after childbirth. Does a healthy sex life survive parenthood? What changes can couples expect, and how can they navigate this new phase of their relationship? Let's find out.Guest: Dr. Manasi Naralkar, Gynaecologist and infertility prevention expert Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @v-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP Pune

    47 min
  2. 1d ago

    म्हातारपण सुखाचं कसं जगायचं? Healthy Aging, दीर्घायुष्य, आरोग्यदायी जीवनशैली, व्यायाम, आहार, Mindfulness, Brain Health आण

    आपण वय वाढणं थांबवू शकत नाही, पण वय वाढताना शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी काय करता येतं? या भागात Dr. Aarti Ranade शरीरातील बदल, स्नायूंची ताकद, मेंदूचं आरोग्य, झोप, ताणतणाव, दाह (Inflammation), जीवनशैली आणि दीर्घकालीन आरोग्य यांचा परस्पर संबंध सोप्या उदाहरणांद्वारे समजावून सांगतात.आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार टाळण्यासाठी काय करता येईल, हा या संवादाचा केंद्रबिंदू आहे. वैज्ञानिक संशोधन, प्रत्यक्ष अनुभव आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत निरोगी आयुष्याची सूत्रं या भागात मांडली आहेत.जर तुम्हाला निरोगी तारुण्य, सक्रिय मध्यमवय आणि सुखकर म्हातारपण हवं असेल, तर हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा.कारण आरोग्य ही खर्चाची गोष्ट नाही; ती आयुष्यभरासाठीची सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे.आपण रोज घेत असलेले निर्णय — झोप, खाणं, हालचाल, ताणतणाव हाताळण्याची पद्धत — हे आपल्या शरीरावर वर्षानुवर्षं कसा परिणाम करतात? वय वाढणं अटळ आहे, पण म्हातारपण कसं असेल हे काही अंशी आपल्या आजच्या सवयींवर ठरतं.या भागात Dr. Aarti Ranade अतिशय सोप्या भाषेत शरीरात घडणारे बदल समजावून सांगतात. पेशींचं आरोग्य, दाह (inflammation), स्नायूंची घटणारी ताकद, मेंदूची कार्यक्षमता, हार्मोन्स, झोप, ताण आणि जीवनशैली यांचा एकमेकांशी असलेला संबंध त्या संशोधनाधारित उदाहरणांसह स्पष्ट करतात. वैज्ञानिक विषय सामान्य माणसालाही सहज समजावेत अशा पद्धतीने त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या संकल्पना उलगडून सांगितल्या आहेत.विशेष म्हणजे, हा संवाद केवळ आजारांबद्दल नाही; तर आजार होण्याआधी शरीर आपल्याला कोणते संकेत देत असतं, आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी कोणत्या छोट्या पण प्रभावी सवयी अंगीकारता येतात याबद्दल आहे.जर तुम्हाला तारुण्य निरोगी ठेवायचं असेल, म्हातारपण सुखाचं हवं असेल आणि आरोग्याबद्दलचा गोंधळ दूर करून विज्ञानाधारित मार्गदर्शन हवं असेल, तर हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा.कारण आरोग्य ही अचानक मिळणारी गोष्ट नसते; ती रोजच्या छोट्या निर्णयांमधून उभी राहणारी आयुष्यभराची गुंतवणूक असते.

    1h 13m
  3. 3d ago

    How to Lose Weight without Exercise | Dr Malhar Ganla

    Weight loss, Obesity आणि fitness, excercise याविषयी आज माहितीचा अक्षरशः भडिमार होत आहे. सोशल मीडियापासून ते सरकारी मोहिमांपर्यंत सर्वत्र वजन कमी करण्याचे सल्ले आणि उपाय सांगितले जात आहेत. पण मग एक मूलभूत प्रश्न कायम राहतो तो म्हणजे एवढी माहिती उपलब्ध असतानाही लोकांचं वजन का कमी होत नाही? नेमकं काय चुकतंय? याच महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी देहभान पॉडकास्टमध्ये आपण आमंत्रित केलं आहे ओबेसिटी फिजिशियन आणि Freedom From Diabetes and Obesity चे Co-Founder आणि CIO, डॉ. मल्हार गणला यांना. एपिसोड आज गुरुवारी रात्री ८.३० वाजता रिलीज होतोय. नक्की बघा! या भागात आपण जाणून घेणार आहोत –✅ वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये लोक नेमक्या कोणत्या चुका करतात?✅ ओबेसिटी हा फक्त इच्छाशक्तीचा प्रश्न आहे की एक वैद्यकीय समस्या?✅ वारंवार वजन वाढणं आणि कमी होणं यामागचं विज्ञान काय?✅ क्रॅश डाएट, इंटरमिटंट फास्टिंग आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्स किती विश्वासार्ह आहेत?✅ दीर्घकाळ टिकणारं आणि शास्त्राधारित वेट लॉस कसं साध्य करायचं?वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, ओबेसिटीशी झुंज देत असाल किंवा स्वतःचं आरोग्य अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल, तर हा भाग नक्की पाहा. कारण वेट लॉस हा केवळ वजनकाट्यावरचा आकडा नसून, तो आपल्या आरोग्याशी, सवयींशी आणि जीवनशैलीशी निगडित असलेला एक प्रवास आहे.वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं यापेक्षा, वजन वाढतंच का आणि ते कायमचं कसं कमी करायचं, याची शास्त्राधारित उत्तरं या भागात मिळतील!Timestamps 00:00 - Intro 03:13 – Why are people struggling to lose weight despite having so much information?04:51 – Is "eat less, exercise more" an outdated approach to weight loss?06:30 – Why are hobbies and an active lifestyle important for fitness?10:32 – How do you choose the right exercise for your body type?12:02 – Which blood tests are essential before starting a weight loss journey?15:32 – Why do some people gain weight more easily than others?20:28 – How do you treat obesity in teenagers and young adults?23:20 – Your simple weight loss formula: less junk, fewer carbs, more protein.29:04 – How does the calorie deficit principle really work?32:40 – Intermittent fasting explained: benefits and misconceptions.35:45 – Can you lose weight without exercising?41:21 – What are the signs of a slow metabolism?42:30 – Why is a protein-rich diet crucial for weight loss?48:44 – Final takeaway: 7 practical steps to kickstart your weight loss journey.Guest: Dr. Malhar Ganla, Co-Founder and CIO, Freedom from Diabetes and Obesity Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book by Niranjan Medhekar - https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhanaWhy is weight loss so difficult despite the abundance of information available today? From social media fitness trends to government-led obesity awareness campaigns, we're constantly surrounded by advice on losing weight. Yet, obesity rates continue to rise, and many people struggle to achieve sustainable weight loss.So, what really goes wrong? Is it the way we approach weight loss, unrealistic expectations, lack of consistency, emotional eating, or are there deeper medical and metabolic factors at play?In this episode of Dehbhan Podcast, we dive into the science of obesity, sustainable weight management, and common weight loss myths with Dr. Malhar Ganla, Obesity Physician and Co-Founder & CIO of Freedom From Diabetes and Obesity.Whether you're trying to lose weight, manage obesity, or simply understand the science behind healthy living, this episode offers valuable insights backed by medical expertise.

    53 min
  4. 4d ago

    YouTube Vlogger Mahesh Phadnis Story | @Journeybeyond56 ​

    भटकंती, फोटोग्राफी आणि ट्रॅव्हलॉग या छंदाची मस्त भट्टी जमवत वयाच्या ५६ व्या वर्षी एक अवलिया स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करतो आणि अवघ्या वर्षभराच्या आत या नवीन क्षेत्रात स्वतःचा जम बसवत करिअरची सेकंड इनिंग सुरू करतो! ही भन्नाट गोष्ट आहे व्यवसायातनं अचानक VRS घेत आवडत्या क्षेत्रात मनसोक्त मुशाफिरी करत असलेल्या महेश फडणीस यांची. Journey beyond 56 या त्यांच्या चॅनलचे आज ४० हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स असून, त्यांचे ट्रॅव्हलॉग आज लाखांत views मिळवत आहेत. अचानक निवृत्ती घेतल्यावर सुरुवातीला आलेलं नैराश्य ते एक यशस्वी यूट्यूबर हा त्यांचा संपूर्ण प्रवास महेश फडणीस यांनी देहभानच्या या विशेष भागात उलगडलाय. तुम्हीही मिडलाईफ क्रायसिसमधून जात असाल, स्वतःच्या मनासारखं काही करायचं ठरवत असाल किंवा लवकर निवृत्ती घ्यायच्या विचारात असाल पण नंतर काय करायचं कळत नसेल तर हा हा नवीन भाग नक्की बघा! काय माहित तुम्हालाही तुमच्या मनासारखी एखादी नवी वाट मिळून जाईल!Timestamps 00:00 - Intro 01:56 – Why I Started YouTube at 5610:27 – Travel, Photography & Vlogging Journey13:17 – Storytelling and Writing Passion22:30 – Life After Retirement: Freedom or Pressure?30:30 – Retirement and Men's Mental Health33:50 – Is Early Retirement Overrated?38:37 – Financial Freedom: Money Lessons for Your 40s43:10 – How I Create Unique Travel Vlogs45:40 – Reading Habits That Changed My Life48:23 – Building a YouTube Channel After 5051:12 – Handling Trolls and Online Criticism52:40 – Upcoming Travel Plans and Monsoon TripsGuest: Mahesh Phadnis, Founder, Journey beyond 56 Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe, Founder, V-render Studio Video Editor: Akshay PawarContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book by Niranjan Medhekar - https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhanaWhat happens when a 56-year-old takes voluntary retirement, battles the emotional lows that follow, and decides to pursue a lifelong passion for travel and photography?This inspiring story belongs to Mahesh Phadnis, who turned his love for exploration, photography, and storytelling into a successful second innings. Starting his YouTube channel, *Journey Beyond 56*, after retirement, he built a thriving community of over 40,000 subscribers in just a year, with his travel vlogs now attracting hundreds of thousands of views.In this special episode of Dehbhan, Mahesh Phadnis opens up about his remarkable journey—from the uncertainty and depression that followed an unexpected VRS to reinventing himself as a successful travel YouTuber. He shares valuable insights on finding purpose after retirement, following your passion, and creating a meaningful second career.If you're going through a midlife crisis, dreaming of doing something you've always loved, or planning an early retirement but wondering, "What's next?", this episode is for you.Who knows? You might just discover a new path for yourself.#DehbhanPodcast #JourneyBeyond56 #MidlifeCrisis #SecondInnings #EarlyRetirement #TravelVlogger #TravelPhotography #YouTubeCreator #LifeAfterRetirement #MarathiPodcast

    1 hr
  5. Mar 13

    26 Kg Weight Loss | Pranav Sakhdeo | Niranjan Medhekar

    In this special episode, writer-translator Pranav Sakhdeo shared his journey of shedding 26 kg in just 11 months! लेखक-अनुवादक प्रणव सखदेव यानं अवघ्या ११ महिन्यांत तब्बल २६ किलो वजन घटवलं आहे. एकीकडे मराठी साहित्यातलं त्याचं वजन वाढत असताना किलोकिलोनं स्वतःचं वजन घटवण्याची वास्तवदर्शी कथा ही त्याच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्यांइतकीच सुरस आहे! बरं वेट लॉस करताना त्यानं कोणतेही अघोरी डाएट प्लॅन्स निवडले नाहीत हे विशेष. त्यामुळेच वजन घटवल्यावर गेल्या तीन वर्षांपासून त्यानं कमी झालेलं वजन टिकवलंही आहे. वजन कमी करत नवीन निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा २०२२ पासूनचा त्याचा प्रवास त्यानं देहभान पॉडकास्टमध्ये हातचं काहीही न राखता अगदी सविस्तरपणे उलगडला आहे. Guest: Pranav Sakhdeo, Writer and Translator Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Lights: Chetan DeodharContent Curator: Mohini Wageshwari-Medhekar Studio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana#dehbhan #marathipodcast #weightlossjourney

    45 min
  6. How I overcame alcohol addiction - Anand Vanjpe

    05/15/2025

    How I overcame alcohol addiction - Anand Vanjpe

    Long-distance cyclist and entrepreneur Anand Vajape shared his back story of addictions, how he became an alcoholic and how he overcame this life-threatening disease and started a new beginning एखाद्याला सायकलिंगचं वेड किती असावं? पुणे-कन्याकुमारी दोन वेळा, पुणे-अमृतसर सोलो विदाऊट सपोर्ट, पुणे दिल्ली, पुणे-मुंबई तर असंख्य वेळा. तंदुरूस्तीच्या क्षेत्रातली ही यशोगाथा आहे सायकलिस्ट-आंत्राप्रिनर आनंद वांजपे याची. पण या सक्सेस स्टोरीमागे खूप मोठी तपश्चर्या आहे आणि अनेक संकटांचा सामना आहे. यातलं सगळ्यात मोठं संकट होतं ते म्हणजे अल्कोहोलिझमचं. एखादा माणूस एकदा का दारूत बुडाला की तो आयुष्यातून उठतो इतकंच आपल्याला माहित असतं. पण या जिवावरच्या संकटावर मात करत आनंदनं सायकलिंगमधली आपली सेकंड इनिंग कशी साकारली हे सांगायला स्वतः आनंद आज आपल्यासोबत आहे.Guest: Anand Vanjape, Cyclist and Entreprenur Host: Niranjan Medhekar, Writer-Podcaster and Founder, Sounds Great NM LLPEdit and Design: Veerendra Tikhe Content Curator: Mohini Wageshwari-Medhekar Lights: Chetan DeodharStudio: @V-render V-render Studio, PuneProduction: @soundsgreatnm Sounds Great NM Audio Solutions LLP PuneDehbhan Book Link: https://www.rajhansprakashan.com/prod...#marathipodcast #anandvanjape #niranjanmedhekar

    53 min

About

Dehbhan is a Marathi podcast focusing on everything dedicated to body, mind, and soul. Hello friends! I am Niranjan Medhekar, a journalist turned writer and podcaster. In Dehbhan, which is inspired by my new book of the same name, I talk freely and frankly on topics that matter to us in daily life and that we still neglect the most—physical-mental health, fitness, wellness, and, last but not least, sexuality! Contact For feedback, suggestions and collabs you can reach us at niranjan@soundsgreat.in Instagram : https://www.instagram.com/dehbhan_podcast Facebook : https://www.facebook.com/