गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा झाला. लोकसभेत मराठवाड्यातील एकमेव खासदार आणि विधानसभेत जिल्ह्यात सहा आमदार असे घवघवीत यश मिळाल्यानंतर शिंदे तब्बल 14 महिन्यानंतर संभाजीनगरच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आले. अर्थात निमित्त होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्वतयारी आणि पक्षांतर्गत कुरबुरी थांबवण्यासाठीचा खटाटोप.
資訊
- 節目
- 頻道
- 頻率每週更新
- 發佈時間2025年9月19日 上午2:30 [UTC]
- 長度10 分鐘
- 集數158
- 年齡分級兒少適宜