मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी सुद्धा होती. त्यामुळे गप्पांचा आवाका (आणि हो... लांबी सुद्धा) जी वाढली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. या सत्रात नेहमीप्रमाणेच नवे विषय, त्याच्या नव्या बाजू, नवी पुस्तकं हे तर समजलंच पण नवे शब्द, नवे पदार्थ आणि अर्थ नियोजनाच्या क्लुप्त्या सुद्धा सापडल्या. आपण सगळे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही केवढे एकमेकांना जोडले गेलेलो आहोत, हे प्रकर्षाने जाणवलं.   

आणि हाच दुवा मनात ठेवून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. लवकरच तिसरे सत्र घेऊन परत येऊ. तोपर्यंत दुवा में याद रखना. प्रतिक्रिया कळवत राहा. या गप्प्पा तुमच्या मित्र आणि परिवारापर्यंत पोचवत राहा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter