
# 1860: "पाऊस आपल्यासारखंच वागतोय" लेखक समीर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Send us a text
पावसाचंही तसंच झालंय. आताशा वेळ नसतो त्याच्याकडे. वर्षाची सरासरी एका दिवसात गाठतो. कधी कधी महिनाभर येत नाही कुठे तरी बिझी असतो. अचानक येतो मग. सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा, पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन.
विचारलं तर म्हणतो "आता मन रमत नाही गं आई".
पावसाचंही तसंच झालंय. त्याचं आता मन रमत नाही. आता तो बसरतो फक्त 'बॅकलॉग' भरण्यासाठी. त्याच्याकडे वेळ उरला नाही. तो कुणाची विचारपूस करत नाही की कुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही.
दोस्तहो पाऊस बदललेला नाही आणि चुकलेलाही नाही तो तर आपल्यासारखंच वागतोय. मग त्याला दोष देऊन कसं चालेल? तरीही एका गोष्टीने व्याकूळ व्हायला होतं.
अपराध, चुका करतात वेगळेच लोक. आणि त्याचे 'वेदनासूक्त' गावे लागते भुकेजलेल्या श्रमलेल्या अर्धपोटी निरपराधांना. हा कसला न्याय म्हणायचा ?
Информация
- Подкаст
- ЧастотаЕжедневно
- Опубликовано28 сентября 2025 г. в 18:30 UTC
- Длительность9 мин.
- ОграниченияБез ненормативной лексики