Life of Stories

# 1861: "शिक्षण विद्या देतय तशी लाजबी देतय" लेखक विशाल गरड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Send us a text

टपरीपुढच्या बाकड्यावर डिगा नाना पेपर वाचत बसले होते. पप्याचं अगोचर बोलणं  ऐकलं म्हणून न राहवून ते  महाद्याला म्हणाले 

 "आत्ता पस्तोर बापाला दहा लाख रुपायला झुपीवलंय ह्यनं. गावातल्या समद्या टपऱ्यावर अन् हाटेलात उधारी हाय ह्यजी. बापाची गाडी घेवून फिरण्याबिगिर ह्यला कायबी येत न्हाय. मोप शिकून इंजिनिअर झालाय म्हणत्यात, पण आजून रुपायाची मिळकत न्हाय. 

नुसतं बापाच्या जीवावर जगतंय. आरं त्येला इंग्रजी येत असून त्येनं काय दिवा लावलाय अख्या गावाला ठाव हाय की. महाद्या तू जर शिकला असता तर आता जी काम करतूय ह्यातलं एकबी काम त केलं नसतंस, कारण शिक्षण विद्या देतंय, तशीच लाजबी देतंय बाबा.”